Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

वास्तुशास्त्राच्या मुख्य टिप्स , 3 दिवसात बदलेल भाग्य !!!



वास्तू काय आहे, लोक याला एवढं महत्त्व का देतात, हे सर्वांना माहीतच आहे. पण आज आम्ही तुम्हाला वास्तू शास्त्राशी निगडित त्या गोष्टींबद्दल सांगणार आहे, जे जाणून तुम्ही आश्चर्यात पडाल कारण अर्ध्याहून जास्त लोक ह्या चुका रोजच करतात, ज्यामुळे त्यांच्या घरात रोजच अडचणी येतात.

वास्तुशास्त्रानुसार वास्तूचा मुख्य दरवाजा फक्त बाह्य जगातून वास्तूमध्ये येण्यासाठी नसून वास्तूत आनंद, उल्हास आणि उज्ज्वल भाग्य येण्यासाठी तो एका संक्रमकाची भूमिका पार पाडत असतो. आरोग्य, संपत्ती व कुटुंबातील सुसंवाद यासाठी वैश्विक ऊर्जा महत्वाची असते, त्या उर्जेला वास्तूत येऊ देणे वा बाहेर ठेवणे यात मुख्य दरवाजाची भूमिका महत्वाची ठरते, तसेच वास्तू विषयी अनुकूल वा प्रतिकूल मतावर आपली छापही सोडत असतो.

मुख्य दरवाजा हा उत्तर, ईशान्य, पूर्व, किव्वा पश्चिमेला असेल तर शुभ समाजाला जातो.  दक्षिण, नैऋत्य, वायव्य , आग्नेय दिशेला असणारे दरवाजे टाळावे. दक्षिणेस वा नैऋत्येस दरवाजा असेल तर जस्त धातूचे पिरॅमिड आणि हेलिक्स वापरून दोष टाळता येतात. वायव्य दिशेस असलेल्या दरवाजाला पितळेचे पिरॅमिड आणि हेलिक्स वापरून दोष टाळता येतात, तसेच आग्नेय दिशेस असणाऱ्या दरवाजासाठी तांब्याचे हेलिक्स वापरावे असे परमार सुचवितात.



लक्षात ठेवा की डस्टबिन घराच्या मुख्य दारासमोर ठेवू नये, असे केल्याने देखील घरात लक्ष्मीचा वास राहत नाही. आरोग्यदायी जीवनासाठी झोपताना पुर्वेला व दक्षिणेला पाय करून झोपु नये . आपण कुठे व कसे झोपतो यावर आपले आरोग्य अवलंबुन असते. घराची उत्तर दिशा बंद असेल तर कर्ज-बाजारी होण्याचे प्रमाण वाढते आणि घरातील आर्थिक समस्या वाढतात. घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये आणि घरामध्ये शुभ उर्जा भक्कम रहावी यासाठी मुख्य दरवाजाला लाकडी उंबरा बसविणे महत्वाचे आहे.

सुख-समृद्धीसाठी घराच्या मुख्य दरवाज्यासमोर बालाजीचा फोटो लावावा .नवीन घर घेताना पहिल्या व शेवटच्या मजल्यावरचे घर विकत घेणे टाळावे . दरवाजावर नावाची पाटी लावावी, दरवाजा उत्तरेला व पश्चिमेला असेल तर धातूची पाटी वापरावी. दक्षिण व पूर्वाभिमुख दरवाजा साठी लाकडाची नावाची पाटी वापरावी. घर बांधताना ईशान्य दिशेला जिना येऊ देऊ नये . मुख्य दरवाजासमोर आरसा ठेऊ नये.
                 


बिजागिऱ्याना नेहमी तेलपाणी करावे, दरवाजाला असणारे धातू घासून पुसून स्वच्छ ठेवावे, तुटलेले वा तडकलेले लाकूड काढून टाकावे, खिळे हरविलेले नसावे, वाजवीपेक्षा जास्त खिळे काढून टाकावे . सुख - समृद्धीसाठी घराची दक्षिण आणि पश्चिम दिशा जास्तीत जास्त जड करावी . घराचे प्रवेशद्वार नेहमी आकर्षक ठेवा. दारामध्ये नेहमी प्रकाश राहील याची काळजी घ्या यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहते.घराच्या मुख्य दरवाजा समोर लिफ्ट असेल तर घरामध्ये आर्थिक ,शारीरिक व मानसिक हानी होते .