खारीक म्हणजेच सुकवलेले खजूर. अनेक गोडाच्या पदार्थांमध्ये, लाडू, खीर अशा पदार्थांमध्ये खारीक हमखास वापरले जाते. धष्टपुष्ट शरीरासाठी खारीक अत्यंत उपयुक्त फळ आहे. हिवाळ्यात खारकेचे सेवन खूप पौष्टिक मानले जाते.‘खारीक आणि खोबरं खात जा तब्येत सुधरेल’, मात्र खारीक आणि खोबरे खाल्ल्याने खरेच तब्येत सुधारते का याविषयी अनेकांना माहिती नसते. जर तुमची पचनशक्ती चांगली असेल तर खारीक जास्त प्रमाणात खाणे फायदेशीर ठरते.विशिष्ट जातीचा खजूर वाळवून खारीक तयार केली जाते. संस्कृत; तसेच हिंदीत खर्जुरी, मराठीत खारीक, तर इंग्रजीत ड्राय डेट असे म्हणतात.खारकेचे सेवन वर्षभर केले जाऊ शकते, कारण हे फळ वाळलेल्या स्वरुपात बाजारात वर्षभर उपलब्ध असते
खारीकमध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.खारीकमध्ये व्हिटॅमिन सी, डी असतात. ऊर्जा, साखर, आणि फायबर एक चांगला स्रोत आहे.कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जस्त मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे खारीक खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते.अनेकदा स्त्रीयांच्या आरोग्यासाठी खारीक लाभदायक असते हे तुम्ही वाचले असेल. परंतू पुरूषांच्या आरोग्यासाठीदेखील खारीक तितकीच लाभदायक आहे.
- खारीक हा शरीराची शक्ती वाढवण्यासाठी उत्तम खुराक आहे. ज्यांची शरीरयष्टी किरकोळ किंवा कमजोर आहे अशा व्यक्तींनी खारीक खाल्याने त्यांच्या शरीरातील ताकद वाढण्यास यामुळे मदत होईल. त्यादृष्टीने खारीकचे सेवन फायदेशीर ठरते. यासाठी रात्री दोन ते तीन खारका स्वच्छ धुऊन पाण्यात भिजत घालाव्यात. सकाळी उठल्यावर चहा घेण्यापूर्वी या खारका खाव्यात.
- खारीक पुरुषांमधील नपुंसकता दूर करण्याचा रामबाण उपाय आहे. तीन महिने सलग खारीक खाल्ल्यास नपुंसकतेची समस्या दूर होईल. दररोज रिकाम्या पोटी खारीक खावी. पहिल्या आठवड्यात एक खारीक आणि दुसर्या आठवड्यापासून पुढील दोन आठवडे दोन खारका दररोज चावून-चावून खाव्यात. तिसर्या आठवड्यात तीन खारका खाव्यात आणि चौथ्या आठवड्यापासून 12 व्या आठवड्यापर्यंत चार-चार खारकांचे दररोज सेवन करावे. नपुंसकतेची समस्या दूर होईल.
- भूक वाढवण्यासाठी खारीक दुधामध्ये उकळून घ्या. थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर बारीक करून घ्या. हे दुध खूप पौष्टिक असते, यामुळे भूक वाढते आणि अन्न व्यवस्थित पचते.
- बिया काढलेल्या चार खारका, एक चिमुटभर केशर( १२५ मिलीग्रॅम) आणि आवश्यकतेनुसार साखर ५०० मि.ली दुधामध्ये उकळून घ्या. रात्री झोपताना या दुधाचे सेवन केल्यास शरीराला उर्जा प्राप्त होते.
- सर्दी, पडसे, खोकल्यामुळे त्रास होत असल्यास ग्लासभर दूधात पाच खारीक, पाच काळामिरीचे दाणे, वेलचीचे तुकडे एकत्र करून उकळावेत. या मिश्रणामध्ये चमचाभर तूप मिसळा. हे ड्रिंक सायनसच्या रूग्णांदेखील फायदेशीर ठरते.खारीकातील मॅग्नेशियम घटक शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
- खारीक नियमित खाल्ल्यास दमा असणार्या रुग्णांना आराम मिळेल. अर्धांगवायू आणि हृदयविकाराचा त्रास खारकाच्या सेवनाने कमी होईल.ज्या लोकांना अशक्तपणा असतो. त्यांच्यासाठी खारीक खूप फायदेमंद आहे.खारीक नियमित खाल्ल्यास हृदयविकार होत नाहीत. शरीरातील रक्ताची कमतरता खारकाच्या सेवनाने दूर होईल. खारीक हाडांसाठी पोषक असते. पाठीचा कणा व सांधे यांची झीज होणे, अशक्तपणामुळे कंबर दुखणे, कमजोरी आदी त्रास होत असल्यास खारकेची पूड दुधासह घेणे गुणकारी आहे.
सौजन्य : इंटरनेट




