Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

चिंच खाण्याचे हे होतील फायदे !! फायदे जाणून थक्क व्हाल !! #Benefits of tameriand #Health


चिंच सुटलं ना पाणी तोंडाला असच आहे ओ, चिंच जरी नाव घेतलं तर लगेच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटत , झाडाला लागलेल्या कोवळ्या आंबट चिंचा मीठासोबत खायच्या म्हणजे एक प्रकारची वेगळीच पर्वणी असते ,त्याचा अनुभव पण खूप छान असतो.आंबड-गोट चवीमुळे भारतीय पदार्थाच चिंचेला वेगळेच महत्त्व आहे. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपल्या शरीरासाठी चिंच खूप लाभदायक आहे.

चिंचेचे नियमित सेवन शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते व मजबूत होते. चिंचेतील ‘क’ जीवनसत्व अनेक रोगांना शरीरापासून दूर करण्यास मदत करते.घसा खवखवणे यावर चिंचेच्या पियांचे पाणी याने गुळण्या केल्यास आराम मिळतो.चिंच ही तुमचा लठ्ठपणा काही प्रमाणात नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यामध्ये असलेले जाइड्रोसिट्रिक नावाचे अॅसिड असून ते शरीरातील फॅट कमी करते.केस गळती कमी करण्यासाठीही चिंचेचा वापर करतात.

चिंचेच्‍या कोवळया पानांची चटणी व कोशिंबीर फारच रूचकर लागते. चटणीत चवीला गुळ, हिंग व तिखट किंवा हिरवी मिरची वाटून टाकतात.चिंचेच्या पाल्‍याच्‍या रसात तुरटी उगाळून त्‍यात कापडाची पटटी भिजवून डोळयावर बांधल्‍यास नेत्रविकार बरा होतो.




डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी चिंचेचा कोळ बनवून डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांवर लावा.चिंचेचा कोळ, कांदा रस आणि आल्याचा रस एकत्रित दिल्यास ओकारी, जुलाब, पोटदुखी थांबते. पाल्‍याच्‍या रसात तुरटी उगाळून त्‍यात कापडाची पटटी भिजवून डोळयावर बांधल्‍यास नेत्रविकार बरा होतो.चिंचेच्या टरफलापासून चिंचाक्षार बनवतात वेगवेगळ्या वनौषधी आणि या चिंचेच्या क्षारापासून बनवलेल्या शंखवटी नावाच्या गोळ्या पोटदुखीवरचे उत्तम औषध आहे. लिंबू रसाबरोबर या गोळ्या सकाळ, संध्याकाळ 2/2 या प्रमाणात घ्याव्या.

चिंचेच्‍या कोवळया पानांची चटणी व कोशिंबीर फारच रूचकर लागते. चटणीत चवीला गुळ, हिंग व तिखट किंवा हिरवी मिरची वाटून टाकतात.शरीराची पचनशक्ती कमी असल्यास चिंच खाणं फायदेशीर ठरतं. चिंचेमधील फाइबर, टार्टेरिक आम्ल आणि पोटेशियम हे घटक पचनशक्ती मजबूत करण्यासाठी कार्य करतात.चींचोक्यांमधे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असतो त्यामुळे न्यूमोनिया जीवाणू, टायफस यांपासून आपले संरक्षण करू शकतो.चिंचोके वातहरक रक्‍तदोषनिवारक व कफनाशक असतात. साल काढलेल्‍या, भाजलेल्‍या चिंचोक्‍याचं चूर्णीचे मध व तुपातून चाटण केल्‍यास कफ व कफाबरोबर रक्‍त पडणाचे थांबते.



सूचना : सदरील आरोग्यविषयक लेखात दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची असून, आरोग्यविषयक कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्याने करावी.