Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपाय , मग हे मुद्दे वाचाच !!, How To Improve Memory Power

             

        तुम्‍हाला जर आयुष्‍यभर तुमची बुध्‍दी चांगली ठेवायची असेल तर त्‍यासाठी योग्‍य ती काळजी घ्‍यायला हवी. धावपळीच्‍या जिवनात आरोग्‍याची काळजी घेतली तरी बुध्‍दीचा चंचलपणा वाढू शकतो. स्‍मरणशक्‍ती वाढवण्‍यासाठी विशेष मेहनत घेतली तरच बुध्‍दीचा विकास होतो.स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सल्ले देणारे कमी नसतात .आई-वडील एक सांगतात, शिक्षक एक आणि मित्र काहीतरी भलतंच.

रात्री बदाम पाण्यात भिजवून सकाळी साल काढून खा. माशांमध्ये असणारे फिश ऑईल तुमच्या शरीरासाठी चांगले असते. माशांच्या सेवनामुळे तुम्हाला अनेक फायदे होतात. दररोज मधाचा वापर केल्याने बुद्धी तल्लख होण्यास मदत होते. चहा पिण्यापेक्षा जर तुम्ही ग्रीन टी चे सेवन केले तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. दररोज हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करा. तुम्ही जर डार्क चॉकलेट खाल तर तुम्हाला त्याचे फायदे नक्कीच जाणवतील.






डार्क चॉकलेटच्या सेवनामुळे तुमच्यावरील अतिरिक्त ताण कमी होतो आणि तुमच्या बुद्धीला चालना मिळते. आवळ्याचा मुरांबा खाल्ल्याने विसरण्याचा त्रास कमी होतो. जेवणाअगोदर एक सफरचंद साल न काढता सेवन केल्याने स्मरणशक्तीत वाढ होते. नियमित गुलकंदाचे सेवन केल्यानेही बुद्धी तल्लख होण्यास मदत होते. आठवड्यातून एक वेळा भोपळ्याची भाजी खाल्ल्याने स्मरणशक्तीत नक्कीच वाढ होते. प्रतिदिन अक्रोडाचे सेवन करावे.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योगासने (Yoga To Increase Memory) :

1. सर्वांगासन (Sarvangasana)
2. पद्मासन (Padmasana)
3. पद्महस्तासन (Padmahastasan)
4. भुजंगासन (Bhujangasana)
        5. हलासन (Halasan)