Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

श्रावण पाळा, मांसाहार टाळा !! काय कारणं आहेत? समजून घ्या ..


श्रावण महिना हा श्रद्धा असणाऱ्यांसाठी अतिशय पवित्र महिना समजला जातो. ह्या महिन्यात लोक श्रद्धेने महादेवाची पूजा करतात. उपवास ठेवले जातात. संपूर्ण भारतातील हिंदू धर्मीय लोक हा श्रावण महिन्याचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि मनोभावे साजरा करतात.

श्रावण आणि श्रवण यांचा अनुबंध फार पुरातन आहे. श्रावण हा श्रवणभक्तीचा महिना होय. श्रावणात अनेक षिवमंदिरांमध्ये कीर्तन सप्ताहांचे आयोजन केलेले असते. श्रावणी सोमवारी हमखास या शिवमंदिरांमधून कीर्तने होतात. `हरी हरा भेद काही करू नका वाद` ही संतांची धारणा आहे. ` शीव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या माथी` असे संतांनी म्हटले आहे. श्रावणात वारकरी कीर्तन आणि हरदासी कीर्तन हमखास ऐकायला मिळाले इतकेच नव्हे तर पांडवप्रताप, शिवलीलामृत, नवनाथ, हरिविजय, जैमिनी अश्वमेध, काशीखंड आदी ग्रंथांचे वाचनाही घरोघरी होते. या ग्रंथांच्या वाचनाला `पोथी लावणे` `पोथी सांगणे` असे म्हणतात.

महिन्यात मांसाहार केल्यास वेगवेगळ्या व्याधी जडू शकतात. अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. श्रावण महिना हा प्रेम आणि प्रजनन काळ मानला जातो. ह्या काळात मासे तसेच इतर पशु, पक्ष्यांमध्ये गर्भधारणेची संभावना असते. कुठल्याही गर्भवतीची हत्या करणे हे हिंदू धर्मात पाप मानले जाते. तसेच कुठल्याही गर्भवती जीवाला खाल्ल्याने मानवाच्या शरीरात काही हार्मोनल समस्या देखील उद्भवू शकतात.




या दरम्यान वृक्ष कापू नये उलट कुटुंब आणि मित्रांसह अधिकाधिक वृक्ष लावावे. तसेच देवाला बेलपत्र आणि ताजी फुलं अर्पित करावी.महादेवाची पूजा करताना हळद, शेंदूर आणि तुळस चुकीने देखील अर्पित करू नये. या वस्तू महादेवाला वर्ज्य मानल्या गेल्या आहेत. या दरम्यान कोणत्याही प्रकाराचे वाईट विचार मनात आणू नये. कोणाशी वाईट वागू नये. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावं. मन शांत ठेवावं आणि अधिकाधिक वेळ साधना करावी