ऋतुबदलामध्ये त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. उन्हाळ्यानंतर पावसाळा, पावसाळ्यानंतर पुन्हा उन्हाळा असे सातत्याने ऋतुबदल होत राहिले, तर त्वचेचा पोत बदलतो. त्वचा खराब होते. अशावेळी त्वचेला काळजी आणि पोषणाची आवश्यकता असते.
पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेमुळे आणि त्यामुळे येणाऱ्या सततच्या घामामुळे विषाणूंचा संसर्ग वाढतो आणि त्यामुळे त्वचाविकार होतात. तसेच पावसात चिखलाच्या पाण्यातून चालल्यामुळे पायालाही अनेक संसर्ग होऊ शकतो. तसेच ज्या व्यक्ती पाण्यात अधिक वेळ राहतात त्यांचे पाय ओलसर असल्याने त्यांना संसर्गजन्य त्वचा-रोगांची लागण लवकर होते. यात त्वचेला खाज येणे, त्वचा लाल पडणे किंवा त्वचा फाटणे अशा समस्या उद्भवतात. त्यामुले घरगुती उपायांसह डाँक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार केल्यास या समस्यांवर मात करता येऊ शकते.
तेलकट त्वचा :
तेलकट आणि कोरड्या त्वचेचं मिश्रण असणारी त्वचा तिसऱ्या प्रकारची त्वचा आहे. तेलकट त्वचा असलेल्या व्यक्ती आपल्या त्वचेचा चिकटपणा घालवण्यासाठी सौंदर्य प्रसाधने त्वचेवर लावतात, तेव्हा त्याची परिणिती मुरुमे आणि पुटकुळ्या येण्यात होते. तेलकट त्वचा असल्यास त्वचेतील तैलग्रंथीवर परिणाम करणाऱ्या औषधी फेस वॉशचा वापर दिवसांतून दोन ते तीन वेळा करणे गरजेचे आह. दिवसभरात तेलकटपणा प्रमाणात ठेवण्यासाठी चेहरा दोन ते तीन वेळा साध्या पाण्याने धुवावा. चेहरा धुतल्यानंतर मॉईश्चराइज अवश्य लावावं आणि आठवड्यातून एकदा स्क्रबिंग करावं.
कोरड्या त्वचेची अशी घ्या काळजी :
कोरड्या त्वचेवर अॅलर्जी होण्याची शक्यता अधिक असते. या त्वचेवर कोणत्याही प्रकारची चमक नसते. अनेकदा अशी कोरडी त्वचा खूप खेचल्यासारखी वाटते की आपलं सगळं लक्ष त्या चेहऱ्यावरच राहतं. विशेष करून तोंडाच्या जवळपासचा भाग अधिकच ड्राय होतो. म्हणून मॉश्चरायझर दिवसातून अनेकदा लावावं.मात्र , आपल्या त्वचेचा पोत नेमका कोणता आहे, त्यानुसार एक त्वचा विशेषज्ञ आपल्या त्वचेसाठी सर्वात चांगला पर्याय सांगू शकतात .
- निरोगी संतुलित आहार घ्या.
- जास्त वेळ ओले कपडे परिधान करू नका.
- आपली त्वचा हायड्रेट करण्यासाटी आंघोळीनंतर एखादे चांगले मॉइश्चरायझिंग क्रीम लावू शकता.
- ओल्या चपला वापरू नयेत.



