Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

झोपेत वाईट स्वप्न पडतात ? स्वप्नं पडण्यामागची कारणे !! #Dreams


दिवसभर दगदग केल्यावर शरीराला पुरेशी विश्रांती आणि झोप ही मिळणे आवश्यक आहे. रात्री झोपेत पडणारी स्वप्नं माणसाच्या हातात नसतात. स्वप्नं नेहमी विचार करत करत गाढ झोप लागण्याच्या आधीच्या अवस्थेत पडतात. झोप व्यवस्थित नाही झाली की त्याचा परिणाम संपूर्ण दिवसावर होतो. ही ना धड जागृत अवस्था असते आणि ना धड निद्रिस्त अवस्था असते. म्हणजे चांगली झोप हा आरोग्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे.

अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच स्वप्नं पडू शकतात. कधी कधी एखाद्या स्वप्नामुळे आपण रात्रभर न झोपल्याची भावना मनात निर्माण होते. चांगली किंवा वाईट स्वप्ने ही मानसिक आजारांचे नव्हे तर प्राथमिक स्वरूपातील मानसिक विकारांचे लक्षण आहे. श्वासोच्छ्वास घेताना होणारा त्रासही भयावह स्वप्नांना कारणीभूत आहे. अनेकदा झोपेत श्वास घेण्याची प्रक्रिया काही क्षणांपुरती थांबते. त्यामुळे मेंदूला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. त्याची परिणती भयावह स्वप्नांमध्ये होते. श्वास घेताना होणारा त्रास नाहीसा केला तर भयावह स्वप्नांचा अंत होणे अवघड नाही.

खरंतर स्वप्नं म्हणजे मनाची अशी एक अवस्था आहे ज्यामध्ये तुमचं मन एक आभासी जगत निर्माण करतं आणि त्यामध्ये रममाण होतं. कधी कधी काही स्वप्नं तुम्हाला भविष्यातील एखाद्या गोष्टीचे संकेतही देऊ शकतात.











आपण आताच काही मिनीटांपूर्वी झोपलो आणि लगेच उठलो असे वाटू शकते. कधी कधी शेवाळावरून पाय घसरल्याचा भास होतो आणि आपण दचकून जागे होतो. त्यामुळे बऱ्याचदा स्वप्नं तुम्हाला घाबरवून उठवतात. एकच प्रसंग किंवा घटना वारंवार दिसणे, त्याविषयी सतत विचार येणे. काही स्वप्नं तर अंगावर घाम आणि छातीत धडधड निर्माण करतात.साप दिसणे ,धनलाभ होणे , कधी स्वप्नात आपण राजे-महाराजे असतो आपल्या सेवेत हजारो माणसे आपल्या दिमतीला असतात तर कधी कधी जंगलात एखादा जंगली प्राणी आपल्या मागे लागलेला आहे असं दिसतं. त्यामुळे स्वप्नं कशी पडतात, स्वप्नं पडण्याची कारणे कोणती असतात अशा अनेक गोष्टींबाबत आपल्याला उत्सुकता लागलेली असते. थोडक्यात झोपेत पडणारी स्वप्नं ही एक गुढ आणि रहस्यमय गोष्ट आहे.