भारतामध्ये तुळशीला सर्वात पवित्र औषधी वनस्पती मानलं जातं. तुळशीत एंटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. तुळशीच्या पानांमध्ये आढळणारे घटक पोटातील समस्यांसाठी खूप फायदेशीर असतात. तुळशीची पाने अनेक प्रकारच्या औषधांमध्ये देखील वापरली जातात. इतकेच नाही तर बर्यासच प्रकारच्या सौंदर्य उत्पादनांमध्येही तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. चला तर जाणुन घेउयात तुळशीची पाने खाण्याचे फायदे.
त्वचेवरचे रोग , त्वचेवर खाज सुटणे. यासाठी तुळशी पाने उपयोग होतो. तुळशीची पानंही अँटी बॅक्टेरिअल असतात. जी बॅक्टेरियाची वाढ रोखतात.तुम्हालाही कोणत्या प्रकारचं स्कीन इन्फेक्शन असेल तर त्या स्कीन इन्फेक्शनवर बेसनासोबत तुळशीच्या पानांची पेस्ट बनवून स्कीनवर लावावी. तुळशी पाने आंघोळीच्या पाण्यात टाकुन आंघोळ केल्याने त्वचा तजेदार आणि टवटवीत होते. चेहर्यावरील काळे डाग घालवण्यासाठी तुळशीच्या पानांचा मदत होते.
रोज सकाळी उठल्यानंतर तुळशीच्या रस पिल्याने तुमची स्मरणशक्ती वाढू शकते. पिंपल्स घालवण्यासाठी तुळशीचे पान बारीक करुन चेह-यावर लावावीत. तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुळशीचे पान चाऊन खा. वजन कमी करण्यासाठी रोज तुळशीच्या पानांचा रस घेतल्यास फायदा होतो. केसांच्या प्रत्येक समस्येपासून तुळस सुटका करते. सर्दी-पडसे बरे करण्यासाठी तुळशीच्या पानांत काळेमिरे आणि खडीसाखर मिसळून खावे.
जखम झाल्यास तुळशीच्या पानांचा रस लावल्यास जखम लवकर भरते आणि इन्फेक्शनही होत नाही. तुळशीची पाने शरीरातील रक्त शुद्ध करण्यास मदत करतात. ताप आल्यावर तुळशीचा रस पिल्यानंतर ताप कमी होतो. तुळशीची पानं उकळलेल्या पाण्याने चूळ भरल्यास तोंडाच्या कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून सुटका मिळते.शरीरातील थकवा दूर करण्यासाठी तुळस उपयुक्त ठरते. तुळस कॉलेस्ट्रॉल कमी करून रक्तातील गुठळ्या होणं ही थांबवते.


