Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

#friendship मैत्री कशी असावी !! #friendslove #maitri #yaari #प्रेम



मित्र…कुणी त्याला दोस्त म्हणतं, कुणी यार म्हणतं, तर कुणी ‘ए भिडू’ असं म्हणत खांद्यावर हात ठेवतो. आपल्या आनंदात सहभागी होणारा आणि दु:खातही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो तो मित्रच.

ऑगस्ट महिना उजाडला की वेध लागतात ते फ्रेंडशिप डे म्हणजे मैत्री साजरी करण्याच्या दिवसाचे. या महिन्यात पहिल्या रविवारी येणारा हा फ्रेंडशिप डे म्हणजे तरुणांचा जणू सणच असतो. कॉलेजमधील उत्साहाच्या वातावरणात अजून भर टाकणारा हा दिवस वातावरणच बदलून टाकतो. मग ऑगस्टचा पहिला आठवडा हा मैत्रीच्या आनंदी नात्यामध्ये सर्वाना गुरफटवून टाकणारा जातो.

एक दुसऱ्याबद्दल असणारी ओढ, जिव्हाळा म्हणजे मैत्री. प्रेमाची पहिली पायरी असते मैत्री. मैत्री केल्याशिवाय प्रेम वाढू शकत नाही. मैत्रीची भावना खरोखरच आनंद देणारी आणि जबाबदारीची जाणीव करुन देणारी असते. मित्र / मैत्रीणच असते आपल्या हक्काची.मैत्री हसणारी असावी .मैत्री चिडवणारी असावी प्रत्येक क्षाणाचा आनंद घेणारी असावी एकवेळेस ती भांडणारी असावी पण कधीच बदलणारी नसावी . आपल्या सुख-दुःखात साथ देणारी. आपल्या भावना व्यक्त न करताच समजून घेणारी. प्रसंगी हक्काने मदत करणारी. पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी व्यक्ती. 


मैत्रीचे अनेक पैलू आहेत. मैत्री ही दोन मित्रामित्रांत असू शकते,मैत्रीणीमैत्रीणीत, मित्रमैत्रिणीत असू शकते,तशी वयाच्या कोणत्याही वळणावर होऊ शकते. काहींची मैत्री ही अगदी बालवयापासून तर आयुष्याच्या उत्तरार्धापर्यंत असते. तर काहींची मैत्री ही तारुण्यापासून पुढे चिरंतन असते.   काहींची मैत्री ही अल्पायुषी ठरते तर काहींची मैत्री समाजात आदर्श बनून रहाते. पण अशा मैत्रीसाठी असावी लागते, पराकोटीची नि:स्वार्थीवृत्ती,जीवाला जीव देण्याची वृत्ती आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येक माणूस हा चांगल्या-वाईटाचे मिश्रण आहे,ही जाणीव ठेवून मित्र असो अथवा मैत्रीण त्याच्यातील गुणदोषासह त्याला निरलसपणे  स्वीकारण्याची वृत्ती!


आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरीही तू चल ,आम्ही आहोत असे म्हणणारे मित्र भेटायला खरंच खूप नशीब लागतं. मित्रांच्या फक्त एका शब्दाखातीर जीवाची बाजी लावायला आपण तयार असतो कारण ते असतातच असे कलंदर... कोणतीही गोष्ट हक्काने मागायचे बिनधास्त ,बेधडक बोलण्याचे ठिकाण आणि वेळप्रसंगी कान धरणारे हे फक्त आणि फक्त मित्रच असतात. मित्राचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे कर्ण. कर्णाचा मित्रासाठी त्याग, तो म्हणजे मित्रासाठीच वाट्टेल ते करणारा निश्रयी माणूस. दुर्योधनासारख्या वाईटाच्या मार्गी लागूनही त्याला अखेरपर्यंत न सोडणारा मित्र, त्याचा विश्वासघात न करणारा विश्वासू कर्ण. इतिहासात अजरमर होणारा असा हा कर्ण.



"गिरना भी अच्छा होता हैं,
औकात का पता चलता हैं..
बढते हैं जब हाथ उठाने को,
अपनोंका पता चलता हैं.."

आजच्या बेरोजगारीच्या युगात तर गरज आहे, ती समाजाने बेकार ठरवलेल्या हुशार, सुशिक्षित 'सुदाम्या'ला मैत्रीखातर त्याच्याजवळ उंची पोहे जरी नसले तरीही त्याच्या एका 'कट चहा' वरूनच त्याची परिस्थिती जाणून घेऊन त्याला मदत करणार्‍या सखा श्रीकृष्णाची! .आयुष्याच्या पूवार्धात कधी डोकावून बघितलं एक नक्की जाणवेल की परीक्षांमधून मिळालेल्या गुणांमुळे आपल्याला कायमचं सुख मिळतं असं नाही पण लेक्चर बंक करून मित्रांसोबत केलेल्या मस्तीची आठवण आली की नेहमीच आपसूकच डोळ्यांतून आठवणीचे अश्रू ओघळतील.सौजन्य : इंटरनेट