Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

गणेशोत्सव : श्रीगणेश प्रतिष्ठापना ? जाणून घ्या महत्त्व आणि विधी Ganesh Chaturthi in marathi

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला संपूर्ण देशभरात गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते. या दिवशी भक्तीभावाने बाप्पाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. गणपती, गणेशाच्या केवळ नामोच्चाराने चैतन्य, उत्साह आणि सकारात्मकतेचा संचार मनात, शरीरात आणि वातावरणात नेहमीच होतो. बुद्धिदाता, गणांचा अधिपती, सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता, संकटनाशक अशा कितीतरी बिरुदांनी प्रसिद्ध असलेल्या गणेशाची घरोघरी उपासना, नामस्मरण, पूजन केले जाते. आपण जाणून घेऊया गणरायाची प्रतिष्ठापना करण्याचा महत्त्व आणि विधी... 

गणपतीची स्थापना करण्याकरता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर. पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ, आंब्यांचे डहाळे, सुपाऱ्या, पाण्याने भरलेला तांब्या, पळी, पंचपात्र, ताम्हण, समई, जानवे, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरता मोदक , मिठाई , पेढे , गोड पदार्थ. 

गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी पूजा सूरू करण्यापूर्वी अभंग स्नान करून स्वच्छ नवीन वस्त्र परिधान करा. शुभ मुहूर्ताला पूजा सुरू करावी.दिवसा पूर्वेला तोंड करून किंवा संध्याकाळी उत्तरेला तोंड करून पूजा करावी. स्थापन केलेल्या गणपतीच्या प्रतिमेला धूप, पुष्प, दीप, टिळा लावून पूजा करा.

1. गणपतीच्या दोनपेक्षा अधिक मूर्ती घरात ठेवू नये.

2. बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी योग्य ती आरास आदल्या दिवशीच करून घ्या. 

3. मूर्ती मखरात ठेवून पूजेचं सर्व साहित्य तयार ठेवा. 

4. प्रतिष्ठापना करताना देवाला सर्व गोष्टी उजव्या हातानेच अर्पण कराव्यात. 

गणपतीची मूर्ती घरात स्थापन करताना गणेशाची सोंड कोणत्या दिशेला आहे, हे पाहावे. गणपतीची सोंड डाव्या बाजूला असेल, तर त्याला वक्रतुंड मानले जाते. मात्र, ती सोंड जर उजव्या बाजूला असेल, तर त्याला सिद्धिविनायक मानले जाते. सिद्धिविनायकाचे व्रत, सोवळे, पूजन कडक असते, असे सांगितले जाते. सिद्धिविनायक स्वरुपातील गणपती पूजन करताना अनेक गोष्टींचे भान, व्यवधान बाळगावे, असे सांगितले जाते.


घरातील गणेशाची मूर्ती साधारणतः पाच ते सहा इंच (एक वीत) उंचीची असावी. गणपतीच्या मूर्ती ही मूषकाविना नसावी. ती व्यवस्थित आसनस्थ हवी. तिचे हात, पाय, डोळे, कान सुबक असतील असे पाहावे.यानंतर गणपतीच्या हातामध्ये शस्त्रे असावीत. हार घालताना, फुले वाहताना अडचण येऊ नये यासाठी मूर्तीच्या पाठीमागचे हात व कान यांमध्ये अंतर असेल अशीच मूर्ती आणावी. प्लास्टिक, फायबरच्या मूर्ती शास्त्राला मान्य नाहीत. मूर्ती शक्‍यतो चिकणमाती, शाडूची असावी. तसेच गणपतीचा एक हात आशीर्वाद देतानाच्या स्थितीत आणि दुसरा मोदक स्वीकारण्याच्या स्थितीत असावा.बसलेल्या स्वरुपातील गणपती पूजनामुळे घरामध्ये समृद्धी येते. पैसा टिकतो. शाश्वत धनलाभाचे योग जुळून येतात, असे सांगितले जाते.उभे राहून आशीर्वाद देत असलेली गणपतीची मूर्तीही उत्तम असते.

मूर्ती आदल्या दिवशीच सायंकाळी आणून ठेवावी म्हणजे सकाळी पूजन करणे सोईचे होईल. मूर्तीस सजविलेल्या मखरात, पाटावर किंवा चौरंगावर थोड्या अक्षता घालून त्यावर बाप्पाला बसवावे. मूर्ती ठेवताना मूर्तीचे तोंड पूर्वेकडे किंवा पश्‍चिमेकडे असणे योग्य आहे, दक्षिण दिशेला मूर्तीचे तोंड असू नये. ते उत्तरेकडेही चालेल. घराच्या प्रवेशद्वाराला फुलांचे तोरण किंवा आंब्याच्या डहाळ्या लावाव्या. दारासमोर सुरेख रांगोळी काढावी. मंगलवाद्य म्हणून सनई, चौघडा, नादस्वरम्‌ यांची सीडी, कॅसेट हळू आवाजात लावावी.गणपतीच्या पूजेत लाल वस्त्र, जास्वंदीसारखे लाल फूल, रक्तचंदन यांसारख्या लाल वस्तू वापरवे .