आपल्याला आयुष्यात पुढे काहीतरी योग्य करायचे असेल तर या गोष्टी करणे गरजेचे आहे , कारण आपलं आरोग्य आपल्या हातात असत. आपण आपल्या शरीराला ज्या सवयी लावतो तस आपलं शरीर आपल्याला साथ देत असत.सकाळी व्यायाम करण्याची सवय लावणे म्हणजे, आपल्या मनाशी पक्के करणे कि, मला कोणत्याही आजाराला बळी पडायचे नाहीये,सुरुवातीला जरासं कठीण वाटेल पण नंतर एकदाची सवय झाली कि तुम्ही लवकर उठचाल.व्यायामाची सर्वात योग्य वेळ सकाळी ५:३० ते ६:३० आहे.दररोज योगासने केल्याने शरीर आणि मन शांत होते आणि यामुळे वजन सहजपणे कमी होऊ लागते. सूर्यनमस्कार, कपालाभाती, अनुलोम-विलोम यासारख्या योगासन आणि प्राणायाम पद्धतीचा अवलंब करा.
तसेच स्किन ग्लोसाठी दररोज सकाळी उठल्यावर एक ग्लास गरम पाणी प्यावे.गरम पाण्याने बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते.ज्या लोकांना भूक न लागण्याची समस्या असते अशा व्यक्तींनी एक ग्लास गरम पाण्यात काळी मिरी, मीठ आणि लिंबूचा रस टाकावा. हे पाणी प्यायल्याने भूक वाढते.स्किन ग्लोसाठी दररोज सकाळी उठल्यावर एक ग्लास गरम पाणी प्यावे. आपल्याला दररोज सकाळी किमान 20 मिनिटे सूर्यप्रकाशामध्ये चालत जावे लागेल. यामुळे वजन कमी होते. कित्येक अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की ज्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे त्यांचे वजन लवकर वाढू लागते.
गरम पाण्याने पाचनशक्ती वाढते. जे खाणे पचण्यासाठी जड असते ते पचवण्यासाठी गरम पाण्याचा फायदा असतो. यामुळे पोट स्वच्छ राखण्यास मदत होते. तसेच पाचनसंबंधी कोणतीही समस्या सतावत नाही. पाचनशक्ती तंदुरुस्त असेल तर वेट लॉस करण्यातही मदत होते. यासोबतच गरम पाण्यामुळे फॅट लॉसही होतो.पीरियड्सदरम्यान अनेक महिलांना पोटदुखीचा त्रास होतो.अशावेळेस एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने पोटदुखीचा त्रास बरा होण्यास मदत मिळते. ज्यांना सांधे दुखीचा त्रास आहे त्यांनी शेंगदाणे रात्री भिजत घालावेत आणि सकाळी उठल्यावर खावेत .
पोटदुखीचा त्रास होत असेल अथवा पोटात मुरडा पडत असेल तर गरम पाण्याने आराम मिळतो. दरम्यान गरम पाणी एकदम पिऊ नये थोडे थोडे प्यावे. तसेच दररोज सकाळी रिकाम्या पोटी असे पाणी प्यायल्यास हा त्रास होणार नाही. आल्याचा तुकडा दिवसातून एकदा तरी चावावा असे म्हणतात. आल्याचा अर्क पोटात गेल्यानंतर तुमच्या पोटाचे आरोग्य सुधारते. तुम्हाला पोट बिघडण्याचे त्रास असतील तर तुम्ही दररोज सकाळी कोमट पाण्यात आलं किसून घालावे आणि ते पाणी प्यावे. आलं खाल्ल्यामुळे तुम्हाला नक्कीच फ्रेश वाटेल. सर्दी, पडसं या सगळ्यापासून तुम्हाला हे पाणी दूर ठेवेल.
शरीरातील सर्व अशुद्ध द्रव्ये बाहेर फेकली जातात. त्यामुळे ज्यांना वजन वाढवायचे असेल अशा व्यक्तींनी हे पाणी जरूर प्यावे. वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही चिआ सिड्सचा समावेश तुमच्या सकाळच्यावेळी करायला काही हरकत नाही.जिऱ्याचं पाणी सकाळी प्यायल्याने पोटाच्या बाबत असणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळेल.जिऱ्याचं पाणी हे लाईट ड्रिंक आहे, त्यामुळे चहा-कॉफीऐवजी सकाळी हे पाणी प्यायल्यात तर तुम्हाला दिवसभरासाठी ऊर्जा मिळेल, दिवसभर तुम्ही अॅक्टिव्ह राहाल..तसेच गरम पाणी प्यायल्याने पिंपल्सपासून सुटका मिळते. जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या मध आणि लिंबाचे पाणी पिण्यास काहीच हरकत नाही.त्वचेसंदर्भातील विकार असतील ते कमी होतील.
सूचना : इथे दिलेली माहिती , लेख , सूचना हि सामान्य माहिती घेऊन दिलेली आहे तरी TALENT KATTA या गोष्टीची पुष्टी करत नाही. या माहितीची अंमलबजावणी करताना जवळच्या डॉक्टर किंवा तज्ज्ञ यांच्याची संपर्क साधावा हि विनंती.
सौजन्य : इंटरनेट




